Showing posts with label अंजीर या औषधी वनस्पतीविषयी आयुर्वेदिक माहिती Anjir Ayurvedic medicine information in Marathi. Show all posts
Showing posts with label अंजीर या औषधी वनस्पतीविषयी आयुर्वेदिक माहिती Anjir Ayurvedic medicine information in Marathi. Show all posts

Sunday, September 29, 2024

अंजीर या औषधी वनस्पतीविषयी आयुर्वेदिक माहिती Anjir Ayurvedic medicine information in Marathi

 अंजीर या औषधी वनस्पतीविषयी आयुर्वेदिक माहिती

Anjir Ayurvedic medicine information in Marathi

अंजीर या औषधी वनस्पतीविषयी आयुर्वेदिक माहिती  Anjir Ayurvedic medicine information in Marathi


• मराठी नाव : अंजीर,

• Scientific name: Ficus Carica,

• कुळ : Moraceae.


• झाडाची उंची : ही एक झुडूप वर्गीय वनस्पती असून पानझडी अरण्यात आढळते. पंधरा ते वीस फूट उंची या झाडाची असते.


• पान : या झाडाची पाने साध्या पान प्रकारात मोडतात. मुख्य देठापासून लांब अनेक शीरा असतात. व वडाच्या पानासारखी दिसतात.


• फळे : या झाडाची फळे ही उंबर फळा प्रमाणे असतात. उंबरा प्रमाणेच गुच्छ स्वरूपात खोडाला लागतात. पिकल्यावर जांभळट गुलाबी सेड असल्यासारखी दिसतात.

अंजीर या औषधी वनस्पतीविषयी आयुर्वेदिक माहिती  Anjir Ayurvedic medicine information in Marathi


अंजीर फळाचे औषधी उपयोग:

• अंजीर फळात आपणास व्हिटॅमिन, पोटॅशियम, फॉस्फरस, सेल्युलोज, सोडियम, कॅल्शियम, गंधक, आयर्न असते.

• सेल्युलोज म्हणजेच फायबर असल्याने याच्या सेवनाने पचनक्रिय संबंधित आजार बरे करण्याचे काम अंजीर करते. आतड्याचं काम सुरळीत करते. तसेच बवासिर समस्या, म्हणजेच मूळव्याध , बद्धकोष्ठता दूर करून गॅसेस प्रॉब्लेम थांबवते. मलोस्तर्जन सुरळीत करते. डायरीया समस्येत अंजीर खाणे फायदेशीर असते.

• शरीरात वाढलेले बॅड कोलेस्टेरॉल कमी करून गुड कोलेस्टेरॉल वाढवते. हृदय क्रिया सुरळीत लावते. त्यामुळे ब्लडप्रेशर नियंत्रित करण्यासाठी मदत होते.

• यामधे असणारे सोडियम व पोटॅशियम आपल्या मनावरील मानसिक तणाव कमी करण्यासाठी मदत करते.

• लिव्हरची सूज कमी करण्याचे व त्यांची क्रिया सुरळीत लावते.

• सांधे दुखी कमी करण्यासाठीही अंजीर उपयुक्त आहे.

• यामध्ये कॅल्शियम असल्याने हाडे बळकट करून, हाडाचे विकार कमी करते. तसेच स्नायू बळकट करून उर्जावान बनवण्याचे काम अंजीर करते.

• तोंडावर सुरकुत्या पडल्या असतील तसेच पुरळ उठणे या समस्येने चेहरा निस्तेज होतो. यासाठी अंजीर खाणे फायदेशीर असते.

• पुरुषाच्या शरीरात वीर्य वृध्दी करण्यासाठी तसेच सेक्स समस्या दूर करण्यासाठी अन सेक्स स्ट्यामिना वाढवण्यास तसेच स्त्रियातील प्रजनन क्षमता विकसित होण्यासाठी अंजीर मदत करते. तसेच पुरुष व स्त्री यामधील हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी अंजीर खाणे फायदेशीर आहे.

• बॅड कोलेस्टेरॉल कमी करून वजन नियंत्रण ठेवण्यासाठी अंजीर खाणे फायद्याचे असते.

• अस्तमा असेल तर अंजीर खाणे फायद्याचे असते.

• गर्भवती स्त्रियांना आयर्न कमी होते. तेव्हा गरोदर अवस्थेत असताना अंजीर खाल्याने मुलास व त्यांच्या आईस आयर्न व कॅल्शियम मिळण्यास मदत होते. बाळ सुदृढ होते.

• अंजीरात व्हिटॅमिन ए भरपूर असते, डोळ्याच्या समस्या कमी करून नजर तीक्ष्ण करण्याचे काम अंजीर करते.

• आनिमिया रोगात आयर्न वाढवण्यासाठी अंजीर सेवन करतात त्यामुळे लोह म्हणजेच आयर्न मात्रा वाढून आनीमिया बरा करते.

• ए जीवनसत्त्व असल्याने केसांचे आरोग्य सुधारते आणि केस गळणे थांबवून मजबूत बनवते.

अंजीर या औषधी वनस्पतीविषयी आयुर्वेदिक माहिती  Anjir Ayurvedic medicine information in Marathi


अंजीर कसे खावे?

• रोज रात्री चार ते पाच अंजीरे पाण्यात भिजत घालून सकाळी ते पाणी व भिजलेले अंजीर खाणे फायदेशीर आहे.

• रात्रीच्या वेळी दुधामध्ये भिजवून ते दूध उकळून थंड करून पिणे लाभदायक असते.


• अशी आहे अंजीर या औषधी फळाची माहिती.

• Anjir Ayurvedic fruit information in Marathi


चींचूरडी /चिंचुर्डी आयुर्वेदीक औषधी वनस्पती की जाणकारी Chinchurdi ayurvedik vanaspati ke bare me jankari

  चींचूरडी /चिंचुर्डी आयुर्वेदीक औषधी वनस्पती की जाणकारी Chinchurdi ayurvedik vanaspati ke bare me jankari • हिंदी नाम : चींचुर्डे, • मराठी...