Showing posts with label लवंग वनस्पतीविषयी आयुर्वेदिक माहिती Clove tree information in Marathi. Show all posts
Showing posts with label लवंग वनस्पतीविषयी आयुर्वेदिक माहिती Clove tree information in Marathi. Show all posts

Sunday, September 29, 2024

लवंग वनस्पतीविषयी आयुर्वेदिक माहिती Clove tree information in Marathi

 लवंग वनस्पतीविषयी आयुर्वेदिक माहिती

Clove tree information in Marathi

लवंग वनस्पतीविषयी आयुर्वेदिक माहिती  Clove tree information in Marathi


मराठी नाव : लवंग

English name : clove tree

स्थान: भारत, आग्नेय आशिया, मलाया सेलिबस बेट.

प्रकार : सदाहरित झाड.

पानांची रचना :

पाने लंबवर्तुळाकार असून फांद्या खालील दिशेला अधोमुख असतात.

लवंग वनस्पतीविषयी आयुर्वेदिक माहिती  Clove tree information in Marathi


फुल:

 निळसर तांबड्या रंगाचे असते.

लवंग वनस्पतीविषयी आयुर्वेदिक माहिती  Clove tree information in Marathi


फळ :

फुले सुकून ती वाळतात खाली दांडा वरील बाजूस फुगीर भाग असतो. त्याचेच बियात रूपांतर होते. या सुकलेल्या फुलांचा वापर आपणं मसाले, आहारात व आयुर्वेदिक औषधे निर्मिती करण्यात केला जातो.

लवंगेमध्ये असणारे घटक:

लवंग वनस्पतीविषयी आयुर्वेदिक माहिती  Clove tree information in Marathi


लवंग मध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फ्याटस, फायबर, कॅल्शियम, अँटी ऑक्सीडेंटस, सी व्हिटामिन असते. तसेच युजेनोल हे वेदनाशामक द्रव्य असते.

लवंगेचे औषधी उपयोग:

लवंग वनस्पतीविषयी आयुर्वेदिक माहिती  Clove tree information in Marathi


• दात कीड लागून दुखत असल्यास लवंग बारीक करुन ती दातात धरावी, किंवा लवंग तेलाचा एक थेंब कापसावर घेऊन तो बोळा दुखऱ्या दाढेत धरावा. दाढदुखी थांबेल. तसेच हिरड्या सुजणे, दात दुखणे, हिर्ड्यातून वेदना होणे. यावर लवंग तेल लावणे व लवंग खाणे,दाढेत धरणे फायद्याचे असते.

• शरीरातील बॅड कलोरेस्टेरोल कमी करण्याचे काम लवंग करते. तसेच ब्लडप्रेशर नियंत्रित करण्यासाठी लवंग उपयुक्त आहे.

• सर्दी, पडसे, खोकला झाल्यास लवंग तेलाचा एक थेंब घेऊन त्याचा वास घेतल्याने सर्दी पडसे खोकला कमी होतो.

• डोळ्यांच्या आजारात लवंग खाणे फायद्याचे असते.

• घसा बसणे, यावर लवंग खाणे किंवा लवंग घालून केलेला चहा घेणे फायद्याचे असते.

• डोकेदुखी असेल तर लवंग तेल व सुंठ पावडर किंवा वेखंड पूड घालून मिश्रण कालवून लावल्यास आराम पडतो.

• नारळाच्या तेलात लवंग पूड कालवून चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावर पडलेले काळे डाग, पिंपल्स निघून जातात.

• लवंग शुक्र वीर्य वर्धक असल्याने सेक्स लाईफ सुधारते.

• तोंडाचा घाण वास येतं असल्यास लवंग तेल व गरम पाणी घेवून चुळ भरणे, गुळण्या कराव्यात फायदा मिळतो.

• लवंग तेल घसा, गळा, स्वच्छ करतो.

• लवंग खाण्याने बुध्दी तीक्ष्ण, तल्लख होते. अन् विचारशक्ती वाढते.

• शरीरावर सूज आल्यास, सांधेदुखी असल्यास लवंग तेलाने मालिश करने लाभकारक असते.

• वात, पित्त, कफ हे दोष कमी करण्यासाठी लवंग उपयुक्त आहे.

• युजेनोल लवंगेत असल्याने ते जंतूनाशक असते. व त्यामुळें कर्क रोगावर नियंत्रण करते. तो रोखण्यासाठी प्रयत्न करते.

• शरिरातील बॅड टॉक्सीन काढून टाकण्यासाठी आपणं रोज आहारात लवंगेचा समावेश करावा.

• रोज सकाळी अनुषा पोटी (रिकाम्या पोटी) लवंग काढा करुन पिल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढवते. मन प्रसन्न ठेवते. शरीर निरोगी बनवते.

• पोटदुखी असेल बद्धकोष्ठता, अपचन, ॲसिडिटी असेल तर रिकाम्या पोटी लवंग खाणे फायद्याचे असते.

लवंग आहारात कशी घ्यावी?

• चहा करताना लवंग टाकून तो बनवून घेतल्यास व तो आहारात समावेश करावा.

• जेवणातील मसाल्यात लवंग वापरावी.

• लवंग घालून काढा करुन पिण्याने फायदा मिळतो.

• मसाले भात तसेच जेवणातील कोणत्याही गरम मसाल्यात लवंग वापरावी.

लवंग वनस्पतीविषयी आयुर्वेदिक माहिती  Clove tree information in Marathi


लवंगेचे तोटे :

• लवंग तेल पाच वर्षाखालील मुलांना वापरू नये.

• दोन चार लवंग आहारात असणे लाभकारक असते. त्यापेक्षा जास्त आहारात घेतल्यास उष्णता वाढू शकते. कारण लवंग उष्ण तत्वाची आहे.

लवंगेपासून बनवली जाणारी औषधे:

• लवंगोदन, लवंगादीवरी, लवंगादीचूर्ण, अविपित्तकारी चूर्ण इत्यादी.


चींचूरडी /चिंचुर्डी आयुर्वेदीक औषधी वनस्पती की जाणकारी Chinchurdi ayurvedik vanaspati ke bare me jankari

  चींचूरडी /चिंचुर्डी आयुर्वेदीक औषधी वनस्पती की जाणकारी Chinchurdi ayurvedik vanaspati ke bare me jankari • हिंदी नाम : चींचुर्डे, • मराठी...