कुडा वनस्पतीविषयी आयुर्वेदिक औषधी माहिती
Kuda vanaspati vishyi ayurvedic mahiti
• मराठी नाव : कुडा,
• हिंदी नाव : दुधा, कुर्या,
• संस्कृत नाव : कुटज,
• काश्मिरी नाव : कोर,
• बंगाली नाव : कुर्ची,
• गुजराती नाव : कडो,
• तमिळ भाषेतील नाव : कुटचप्पालै,
• इंग्रजी नाव : Holarrhena Pubescence,
• वनस्पती शास्त्रीय नाव : Holarrhena antidysentarica,
• कुळ : करवीर,
• कुडा वनस्पतीच्या जाती :
• १)पांढरा कुडा, २) काळा कुडा, पांडू कुडा ३) तांबडा कुडा,
• वनस्पती प्रकार :
ही एक झुडूप वर्गीय वनस्पती आहे.
• पाने :
या झाडाची पाने साधे पान या प्रकारात मोडतात.
• फुले :
या झाडास पांढरट रंगाची फुले येतात. स्वस्तिक, तगर किंवा मोगर्याच्या फुलासारखी दिसतात. सुगंधी असतात.
• फळे :
या झाडाला चवळी सारख्या शेंगा लागतात. त्यामधे बिया असतात.
• बिया :
फळात असणाऱ्या लहान बिया दिसायला जवाच्या बियांसारख्या असतात. त्यांना इंद्रजव म्हणून ओळखतात. याची चव थोडी कडू, तुरट चवीच्या बिया असतात. या बियांचा विशेषत आयुर्वेदिक औषधात वापर केला जातो.
• मुळे :
वाकडी तिकडी उदाच्या रंगाची याची मूळे असतात.
• साल :
या झाडाच्या सालीचा उपयोग हा विशेषत आयुर्वेदिक औषधात वापरतात.
• कुडा वनस्पतीचे आयुर्वेदिक औषधी महत्त्व:
• कुडा वनस्पती दीपक स्तंभ असल्याने ताप, ज्वर कमी करणारी असल्याने एखाद्या व्यक्तीस ताप आला असेल. तर कुडा वनस्पतीच्या सालीचा काढा करून दिल्यास ताप कमी होण्यासाठी मदत होते. कुडाच्या सालीचे चुर्ण घेत राहिल्यास हिवताप होत नाही.
• कुडा वेदना शामक आहे, सांधे दुखी असेल, जॉइंट पेन म्हणजेच हाडांच्या जोडातील दुखणे असेल, तसेच आमवाताचा त्रास होत असेल तर कुडा वनस्पतीची साल काढून ती सावलीत वाळवा, सुंठ व हिरडा चुर्ण घेवून सकाळ संध्याकाळ सलग तीन महिने घेत राहिल्यास सांधे दुखी विकार कमी होण्यासाठी मदत होते.
• अतिसार म्हणजेच हगवण असेल तर कुडाच्या सालीचे चूर्ण सकाळ संध्याकाळ एक चमचा घेतं राहिल्यास अतिसार समस्या कमी होण्यास मदत होते.
• दात दुखी झालेली असेल तर कुडाच्या सालीचा काढा करून त्या पाण्याने गुळण्या केल्यास दात दुखी थांबते.
• क्षार धर्मीय , अल्कोहोल असणाऱ्या तसेच पाण्यात कुडा वनस्पतीचे चूर्ण सहज मिसळते. जर पाण्यात आम्ल प्रमाण जास्त प्रमाणात असेल तर कुडा वनस्पतीचे चुर्ण जास्त प्रमाणात मिसळते, विरघळते.
• कुडा वनस्पतीची साल व बिया रक्त संग्राहक व वेदनाशामक आहेत. यामुळे शरीरात कोणत्याही प्रकारच्या वेदना किंवा कळा येत असतील तर त्यावर कुडा वनस्पतीची साल उपयुक्त आहे. रक्त वाढवणारी आहे.
• रक्ती मूळव्याध असेल तर कुडा वनस्पतीच्या शेंगातील बिया ज्यांना इंद्रजव म्हणतात या बियांचे भाजून केलेले चुर्ण चवीला थोडे कडवट - असते. त्याचे चिमुटभर चूर्ण सेवन केल्यास रक्ती आव, मूळव्याधीवर ती प्रभावी औषधी आहे. त्यामुळे ती बरी होण्यास मदत होते. तसेच कुडाच्या पानांच्या विड्या ओढल्याने किंवा इंद्रजव चूर्ण रोज खाल्याने मूळव्याध बरा होतो. रक्त येणे देखील बंद होते.
• इंद्रजवाच्या सेवनाने पोटात वायू धरत नाही. व भुख ही खूप लागते. पोटात वेदना असतील पोटशूळ असेल तर कमी होण्यासाठी बेंबी भोवती इंद्रजवाचे तेल चोळावे. आराम मिळतो.
• कुडाच्या कोवळ्या शेंगा घेवून त्यांची भाजी करून खाल्यास पोटातील जंत नष्ट होण्यास मदत होते.
• उलटी होत असेल तर इंद्रजवाचा काढा करून त्याच्या सेवनाने उलटी थांबण्यास मदत होते.
• दात दुखी असेल तर कुडाच्या सालीचा काढा करून घेऊन गुळण्या कराव्यात. तसेच हिर्डीतून रक्त येत असेल. मुखदुर्गंधी यावर इंद्रजवाचे चूर्ण चोळावे. हिरड्या घट्ट होतात. व मुखदुर्गंधी दूर होते.
• जुनाट दमा असेल तसेच फुफुसा संबंधी आजारावर इंद्रजव चूर्ण उपयोगी असते.
• कुटजारिस्ट औषध हे कुडा वनस्पती पासून बनवले जाते. जे वरील सर्व रोगांवर उपयुक्त आहे. हे पांढरा कुडा वनस्पती पासून बनवले जाते.
टीप :
कुडा वनस्पती चे औषधी उपयोग करताना आयुर्वेदीक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधी घेणे फायद्याचे असते.
•अशी आहे कुडा वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती Kuda vanaspati vishyi ayurvedic mahiti