Showing posts with label अंबाडा / अंबाडी या वनस्पतीची आयुर्वेदिक माहिती Ambadi vanaspati information in Marathi. Show all posts
Showing posts with label अंबाडा / अंबाडी या वनस्पतीची आयुर्वेदिक माहिती Ambadi vanaspati information in Marathi. Show all posts

Sunday, September 29, 2024

अंबाडा / अंबाडी या वनस्पतीची आयुर्वेदिक माहिती Ambadi vanaspati information in Marathi

 अंबाडा / अंबाडी या वनस्पतीची आयुर्वेदिक माहिती

Ambadi vanaspati information in Marathi

अंबाडा / अंबाडी या वनस्पतीची आयुर्वेदिक माहिती  Ambadi vanaspati information in Marathi


• मराठी नाव : अंबाडी, अंबाडा,

• हिंदी नाव : अंबारी, मोईआ,

• संस्कृत भाषेतील नाव : अन्वष्टा

• इंग्रजी नाव : Roselle

• ही एक पीकवर्गीय वनस्पती असून ती शेतात लागवड केली जाते. भाजीसाठी व धागे काढून दोर व वाकाच्या जिनसा तयार करण्यासाठी या वनस्पतीचा वापर करतात.

• पान : साधे पान या प्रकारात या झाडाची पाने येतात. त्यांच्या शेंड्याकडील बाजूस दात्रीसारखे भाग असतात. तुतीच्या पानासारखी यांची रचना असते. या पानांचा आहारात समावेश करतात.

अंबाडा / अंबाडी या वनस्पतीची आयुर्वेदिक माहिती  Ambadi vanaspati information in Marathi


• फुले : पिवळ्या रंगाची जास्वंदीच्या फुलासारखी फुले लागतात .

• फळे : फुले लागून गेल्यावर त्याजागी अनेक बोंडे उठतात. त्यांवर बारीक काटेरी लव्ह असते. ज्यांचा स्पर्श खरखरीत वाटतो.

अंबाडा / अंबाडी या वनस्पतीची आयुर्वेदिक माहिती  Ambadi vanaspati information in Marathi


• बिया : बोंडे पक्व झाल्यावर त्यामधे लहान काळया रंगाच्या त्रिकोनाकृती बिया निर्माण होतात. यापासून पुन्हा या वनस्पतीची निर्मिती होते.

अंबाडा / अंबाडी या वनस्पतीची आयुर्वेदिक माहिती  Ambadi vanaspati information in Marathi


• अंबाडीच्या पानांत असणारे घटक :

• अंबाडीच्या पानांत आयर्न, व्हिटॅमिन ए, बी ६, सी असते, तसेच कॅल्शियम, झिंक, अँटी ऑक्सीडंट असते.

• अंबाडी भाजीचे औषधी महत्त्व :

• या पानांच्या सेवन करण्याने हाई ब्लडप्रेशर नियंत्रित करण्यासाठी मदत करते.

• शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करून रक्तदाब नियंत्रणात ठेवते. व वजन कमी करण्यासाठीं मदत करते.

• आयर्न व झिंक असल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते व नजर चांगली तीक्ष्ण करण्याचे काम करते. तसेच केसांची वाढ चांगली होते.

• सेल्युलोज असल्याने पचनक्रिया सुरळीत करते.

• लघवी करताना जळजळ होत असल्यास ती कमी करते.

• कॅल्शियम हा घटक असल्याने हाडे बळकट करण्यासाठी मदत करते.

• सी व्हिटॅमिन जास्त प्रमाणात असल्याने प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करते.तसेच पांढर्या पेशी वाढवते.

अंबाडा / अंबाडी या वनस्पतीची आयुर्वेदिक माहिती  Ambadi vanaspati information in Marathi


• अंबाडा वनस्पती खाण्याचे तोटे :

• या वनस्पतीच्या पानात ऑक्झ्यालिक असिड असल्याने किडनी स्टोन प्रॉब्लेम असल्यास या भाजीचे सेवन कमी करावे.

• आंबट चव असते, त्यामधे असिड असल्याने पित्त विकार वाढू शकतो. त्यामुळे या भाजीचे पित्त विकार असलेल्या लोकांनी सेवन करू नये. तसेच शिजवताना ही भाजी स्टील किंवा नॉनस्टिकच्या भांड्यात शिजवणे चांगले. तांब्या पितळेच्या भांड्यात शिजवल्यास रासायनिक अभिक्रिया होऊन अन्न बिघडू शकते. ते आपल्या शरीरासाठी अपायकारक असते.

• अशी आहे अंबाडी/ अंबाडा वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती

• Ambadi / ambada vanaspti informeshion in Marathi


चींचूरडी /चिंचुर्डी आयुर्वेदीक औषधी वनस्पती की जाणकारी Chinchurdi ayurvedik vanaspati ke bare me jankari

  चींचूरडी /चिंचुर्डी आयुर्वेदीक औषधी वनस्पती की जाणकारी Chinchurdi ayurvedik vanaspati ke bare me jankari • हिंदी नाम : चींचुर्डे, • मराठी...