गुळवेल वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहितीGiloy ayurvedic medicine information in Marathi
नाव :
गिलोय, गुळवेल, गरुडवेल
मराठी नाव : गरुडवेल , गूळवेल.
संस्कृत भाषेत नाव : अमृता
• प्रकार : वेल
• देश:
दक्षिण आशिया खंडात.
• खोड :
ही एक वेल आहे जी आपल्या घराच्या आसपास असते. पांढरट हिरव्या रंगाची जाडसर वेल आपल्या घराशेजारी रानात, कुंपणावर आढळते.
• पाने:
या वनस्पतीची पाने हिरव्या रंगाची असून ती बदामाकृती असतात. पानात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, झिंक,म्याग्नेशियम असते.
• फळे :
लाल रंगाची गोलाकार फळे या वेलीस असतात.
• गुळवेल वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती:
• गुळवेल वनस्पतीच्या रसाच्या सेवनाने अनेक फायदे होतात.
• मानवी शरीरात प्रतिकार क्षमता वाढवण्याचे काम गुळवेल रस करतो. शरीरात इम्युनिटी वाढवण्याचे काम गुळवेल रस करतो.
• सर्व प्रकारच्या तापावर गुळवेलीचा रस उपयुक्त आहे. हा रस डेंग्यू, मलेरिया, फ्लू, गोवर, टायफॉइड, कावीळ, निमोनिया या रोगांवर अत्यंत गुणकारी आहे.
• गुळवेल ही रक्तातील साखर नियंत्रण करते. तसेच इन्सुलिन निर्मितीस मदत करते. म्हणून मधुमेह ( डायबेटिस) मध्ये आवश्यक , गुळवेल रस दररोज उपाशी पोटी घेणे चांगले असते.
• गुळवेल रस शरीरात प्रतिकार क्षमता वाढवत असल्याने ब्याक्टेरिया व्हायरस यांपासून इन्फ्लेक्शन होण्यापासून वाचवते.
• सांधे दुखी, जॉइंट पेन, गुडघे दुखी यावर गुळवेल काढा आपण सलग पंधरा दिवस सेवन केल्यास फरक पडतो.
• गुळवेल रस रक्तातील दोष निवारक आहे. बॅड टोक्सीन बाहेर काढते. म्हणून त्वचा रोगावर गुळवेल रस सलग घेणे फायद्याचे आहे.
• रक्तदोष निवरणा बरोबर रक्तवाहिन्या मधील ब्लोकेज घालवण्याचे, तसेच रक्ताची गुठळी होऊ न देण्याचे कामं गुळवेलीचा रस करतो.
• भूक लागत नसेल तर गुळवेलीच्या रसा सोबत जीरे व धने यांचे चूर्ण घेणे लाभदायक असते.
• गुळवेल उष्ण तत्वाची असल्याने पोट साफ न होणाऱ्या व्यक्तींनी गुळवेलीच्या रसासोबत पोट साफ करणारे औषध घेणे चांगले असते. यासाठी गुळवेल व आवळा रस एकत्र सेवन करणे फायद्याचे ठरेल.
• गुळवेल रस हा वात,पित्त,कफ कमी करण्याचे काम करतो.
• शरीरात अतिरिक्त पानी वाढल्यास गुळवेल रस सेवन करत राहिल्यास अतिरिक्त पानी बाहेर काढून शरीर निरोगी बनवण्याचे काम गुळवेल रस करतो.
• टेंशन कमी करने, मेंटल प्रॉब्लेम सुधारणे तसेच मेंदू शांत व संतुलित करण्याचे काम गुळवेल रस करतो.
• गुळवेल रस सेवन कसे करावे?
• : गुळवेल पाने किंवा त्याच्या वेलीचे छोटे छोटे तुकडे घ्यावे. ते दोन कप पाण्यात टाकावे. व उकळून ते पाणी एक कप करावे. थंड करून त्याचे सेवन करावे.
• निरोगी व्यक्ती सलग पंधरा दिवस सेवन करून मग दहा दिवस गॅप ठेवून पुन्हा सेवन करु शकतात. त्यामुळे खूप फायदा मिळतो.
• पोट साफ न होणाऱ्या व्यक्तींनी मात्र गुळवेलीच्या रसाचे सेवन करताना पोट साफ करणारे औषध घ्यावे.
• गुळवेलीच्या पानाचा रस देखील काढून तो पाण्यात टाकून उकळून पिणे लाभदायक आहे.
• कराट, किस्तूड पिकल्यावर फुटून निचरा होऊन जाण्यासाठी गुळवेलीची पाने तेल लावून गरम करून लावल्यास शरीरातील घाण निचरून जाते.
• डायबेटिस लोकांना अत्यंत गुणकारी गुळवेल रस असतो.
• ताप कमी करणारी असल्याने अमृतारिस्ट या आयुर्वेदिक औषधाची निर्मिती ही गुळवेली पासून करतात.
• कावीळ रोगात देखील गुळवेल उपयुक्त आहे.
• वजन कमी करण्यासाठी गुळवेल व अलोव्हेरा ज्यूस घेणे चांगले.
• गुळवेल व दोन चमचे आवळा रस घेतल्यास पोटविकारावर लाभदायक असते.
• अशी आहे
गुळवेल वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती