कोरफड (Aleo Vera)वनस्पतीची माहिती
नाव: कोरफड,
संस्कृत भाषेतील नाव : घृतकुमारी,
कोरफडीचे हिंदी नाव : घृतकुमारी.
इंग्रजी भाषेतील नाव: बार्बेडोस अलो,
शास्त्रीय भाषेत: aylo barbe denseis.
कुळ: Liliaceae
मूलस्थान : वेस्ट इंडिज द्वीपसमुह.
चव : कडवट
भारत देशात आढळणाऱ्या जाती:
१)अलो व्हेरा (aleo vera),
२) अलो इंडिका ( aloe Indica)
* कोरफड वनस्पती मध्ये असणारे औषधी गुणधर्म :
• वनस्पती रचना :
ही एक रोपवजा वनस्पती आहे. जाड पाने काटेरी असून अत्यंत शेंड्याला निमुळती होत गेलेली एखाद्या दांड्यासारखी असतात. पानांचा रंग पोपटी हिरवट असून ती काटेरी असतात. एकमेकाला लागून काटेरी निवडुंगाप्रमाणे पाने एका फुलाप्रमाणे लागून एक नक्षीदार रचना करतात.
पानाच्या आतील गर हा पांढर्या रंगाचा असून जेली सारखा असतो. याच गराचा उपयोग केला जातो.
कोरफड वनस्पतीचे औषधी उपयोग :
• त्वचा विकार तसेच अन्य त्वचे संबंधी विकार असतील तर कोरफडीच्या पानांचा गर काढून त्यावर चोळावा. खूप फायदा मिळतो.
• गरम विस्तवाचा चटका, भाजने तसेच त्वचेवर इजा होणे, एखादी जखम झाली असेल तर आपण कोरफडीचा गर काढून त्याचे जेल काढावे, किंवा रस काढून लागलेल्या, भाजलेल्या जागेवर चोळावा. आराम मिळेल. व जखम लवकर भरेल.
• कडक उन्हामुळे व शारीरिक उष्णता वाढल्याने हातापायाची जळजळ होत असेल तर कोरफडीचा गर चोळावा थंडावा मिळतो.
• पोट साफ होत नसेल तसेच पचन समस्या असेल. तर कोरफड रस दोन चमचा त्यामधे सैंधव मीठ व चिमुटभर हळद टाकून तयार केलेलं मिश्रण घ्यावे. पोट साफ होण्यास मदत होते. हे मिश्रण सकाळी काही खाण्याअगोदर घ्यावे.
• कोरफडीचा एक चमचा रस त्यामध्ये सैंधव मीठ चिमुटभर घालून रोज सकाळी व रात्री घेतल्यास कफ, सर्दी, डांग्या खोकला, खोकला कमी होण्यास मदत होईल.
• नाकातून रक्त येत असल्यास कोरफडीचा ताजा रस घ्यावा नाकातून रक्त येणेस प्रतिबंध करते.
• त्वचा विकार, पित्त विकार,तसेच रक्तात गाठी होणे , खाज खरूज असेल यावर कोरफड वनस्पती रस, मंजिस्ठा, हळद यांचे मिश्रण करून लेप द्यावा तसेच चमचा भर प्राशन करावा. बरे होण्यास मदत होते.
• कोरफडीमध्ये फॉलीक असिड असते. ते दर्द निवारक असल्याने अंगदुखी कमी करण्यासाठी उपयुक्त असते.
• मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी रोज एक चमचा कोरफडीचा रस घ्यावा त्यामुळे मधुमेह नियंत्रणात येतो.
• त्वचेवर येणारे पुरळ, त्वचा कोरडी होणे यासाठी त्वचेवर कोरफडीचा गर चोळावा. पुरळ कमी होतात. व सौंदर्य खुलते.
• छातीत जळजळ होणे,गॅस, आतड्यातील जखमा, लिव्हरचे दोष यासाठी रोज एक चमचा कोरफडीचा ताजा रस सैंधव मिठासोबत घ्यावा. बरे वाटेल.
• सर्दी खोकला असेल तर कोरफडीच्या रसात मध मिसळून घ्यावा.
• व्हिटॅमिन सी,• व्हिटॅमिन के, अमिनो असिड असल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी कोरफड उपयुक्त आहे.
• स्त्रियांना योनिस जंतू संक्रमणाने जळजळ होत असेल तर त्या जागी कोरफडीचा गर लावावा दाह कमी होतो.
• मुळव्याधीमध्ये उठणाऱ्या फोडांवर कोरफडीचा गर लावल्यास दाह कमी होऊन आराम मिळतो.
• संधिवाताच्या त्रासात वेदना मुक्ती तसेच संधिवाताचा त्रास कमी करण्याचे काम कोरफड करते.
• उच्च रक्तदाबाचा त्रास असेल बीपी वाढलेली कमी करण्यासाठी कोरफडीचा चमचाभर रस घेणे फायद्याचे असते.
• चयापचय क्रिया सुधारण्याचा कामात कोरफडीचा रस उपयुक्त आहे. अतिरिक्त वजन , चरबी कमी करण्याचे काम कोरफड करते.
• हिर्ड्यांची सूज कमी करण्याचे काम तसेच दाताचे आरोग्य चांगले राहण्यासाठी कोरफडीचा रस हिरड्या व दातांवर चोळावा. हिरड्या मजबूत होतात.
• तोंडाला येणाऱ्या फोडांवर देखिल कोरफड उपयुक्त आहे. फोडावर कोरफडीचा रस चोळावा. आराम मिळतो.
• पोटदुखी असेल तर चमचाभर कोरफडीच्या रसात साखर घालून प्यावे. पोटदुखी कमी करते.
• केसांना खोबरेल तेलात मिसळून कोरफडीचा रस लावल्यास कोंडा होणे , तसेच इतर डोक्यातील जखमा कमी करणे, केसांच्या मुळांचे आरोग्य सुधारण्याचे काम कोरफड करते.
• डोळ्याच्या आरोग्यासाठी कोरफडीचा गर डोळ्यांच्या शेजारी लावावा. तसेच कोरफडीचा रस पाण्यात टाकून डोळे धुवावेत. डोळ्यांचे आरोग्य सुधारते.
• चेहऱ्यावरील सुरकुत्या, पिंपल्स, घालवण्यासाठी लिंबाच्या रसात कोरफडीचा रस मिसळून लावावा. पिंपल्स निघून जातात. आरोग्य सुधारते. थंडीत त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी कोरफडीचा रस चेहऱ्यावर लावतात.
• कोरफडीचा रस कधी घेऊ नये :
• एखादी स्त्री गरोदर असेल तर तिने कोरफडीचा रस खावू नये.
• एखादी स्त्री बाळाला दूध पाजत असेल तर तिनेही कोरफडीचा रस खावू नये.
• दिवसातून सर्वसामान्य माणसाने एक ते दोन लहान चमचे फकत रस घ्यावा जास्त घेतल्यास त्रास होऊ शकतो.
• कमी रक्तदाब असणाऱ्या माणसांनी कोरफडीचा रस सेवन करू नये.
• कोरफडीचा रस जास्त घेतल्यास डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. म्हणून रोज घेणे टाळावे.
• ही आहे कोरफड , अलोव्हेरा वनस्पतीची माहिती.
ayurvedikvanaspati.blogspot.com
No comments:
Post a Comment
ही कोणतीही सरकारी वेबसाईट नसून प्रायव्हेट आहे. तुम्ही सरकारी वेबसाईट पाहून खात्री करून घेऊ शकता.