गवती चहा ( Lemon grass)
• संस्कृत भाषेतील नाव: सुगंध भुतृण, अग्याघास,
• हिंदी नाव: गंधबेना.
• सिंधी नाव : हरिचाय.
• बंगाली : गंधतृण.
• इंग्रजी भाषेतील नाव : Lemon grass.
• इतर नावे :
अर्काला, ऑईल ऑफ व्हर्बेना/ इंडियन मेलिसा ऑईल.
• गवती चहा मध्ये असणारे घटक:
• गवती चहा मध्ये असणारे गुणधर्म :
गवती चहा उष्ण, ज्वरघ्न, उत्तेजक, स्वेद जनक, मूत्रजनन, वायुनाशी, चेतना कारक, संकोच विकास प्रतिबंधक आहे.
• वापर कसा करतात :
गवती चहाची पाने ओली किंवा सुकवून त्यापासून चहा बनवून किंवा काढा करुन तसेच गवती चहा पासून तेल बनवून वापर करतात.
• गवती चहाची पाने उकळत्या पाण्यात टाकून उकळा व गाळा त्यात थोडा मद टाकून सेवन करावा.
- गवती चहा वनस्पतीची आयुर्वेदिक औषधी उपयोग
• गवती चहा मध्ये सायट्रस असते त्यामुळे पचनक्रियेस मदत करते. त्यामुळे जेवणानंतर घेतात. यामुळे पोटदुखी असेल तर थांबण्यास मदत होते. तसेच गवती चहाची वाफ घेणे फायद्याचे असते.
• गवती चहा घेतल्याने पित्त, जळजळ, गॅस एसिडेटी होत नाही.
• शरीराचे डेटॉक्सीफिकेशन करण्यासाठी गवती चहा उपयुक्त होतो.
• युरेटिक गुणधर्म असल्याने शरीरातील अपायकारक घटक बाहेर फेकले जातात. व किडनी व लिव्हर कार्यक्षम व निरोगी बनवण्यासाठी गवती चहा उपयुक्त आहे.
• उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी उपयोगी गवती चहा पडतो.
• गवती चहा मध्ये पोट्याशियम असते. युरेन प्रोडक्शन वाढवून रक्ताभिसरण क्रिया चांगली करते.
• चयापचय क्रिया वाढवते व अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी गवती चहा उपयुक्त होतो.
• गवती चहाने अन्नातून गेलेले फॅटीक एसिडचे डिटॉक्सीफिकेशन होऊन त्याचे नियंत्रण रहाते व डायबिटीस कमी करण्यासाठी मदत होतो.
• निद्रानाश होत असेल, रात्री अपरात्री झोप लागत नसेल तर गवती चहा सेवन करावा त्याने फायदा मिळतो. यासाठी रात्री जेवणानंतर घ्यावा.
• व्हिटॅमिन ए व सी असल्याने त्वचेचे रक्ताभिसरण वाढवतो. त्यामूळे त्वचा सुंदर होते. तसेच केसांचे आरोग्य सुधारते.
• ताप, सर्दी, पडसे तसेच आकडी येणे अशा समस्या असल्यास गवती चहा घ्यावा.
• शरीराचे स्नायू दुखत असतील, तसेच अंगदुखी असेल तर गवती चहा पासून बनवलेल्या तेलाने मालिश करावे फायदा होतो.
- गवती चहाचे तोटे :
• गवती चहाचे अती सेवन केल्यास सुस्ती मारते.
• गर्भवती स्त्रियांनी तसेच स्तनदा मातांनी गवती चहाचे सेवन टाळावे.
• एखाद्या व्यक्तीस आलर्जी असेल तर गवती चहा पिऊ नये.
• विशेषत तोट्यापेक्षा फायदे जास्त गवती चहाचे आहेत.
• अशी आहे गवती चहा वनस्पतीची आयुर्वेदिक माहिती.
• Lemon grass information in Marathi
No comments:
Post a Comment
ही कोणतीही सरकारी वेबसाईट नसून प्रायव्हेट आहे. तुम्ही सरकारी वेबसाईट पाहून खात्री करून घेऊ शकता.