वेलदोड्याचे औषधी गुणधर्म व उपयोग
• मराठी नाव: वेलदोडा, वेलची,
• हिंदी नाव: इलायची
• English name : Cardamom
• कुळ : झिंजिबेरीस
• इलेट्यारिया : हिरवा वेलदोडा.
• आमोमम. : गडद तपकिरी रंगाचा मसाले वेलदोडा.
• हिरवे वेलदोडे विशेषत आहारात वापरले जातात जास्त प्रमाणात.
• आकार :
लहान अंडाकृती आकाराचा असून आतील बाजूस लहान लहान तपकिरी, काळपट रंगाच्या बिया आढळतात. या बियांपासून पुनर्लागवड केली जाते.
• आढळणारे देश:
भारत, श्रीलंका, मलेशिया, टांझानिया, ग्वाटेमाला.
• हिरव्या वेलदोड्यात आढळणारे घटक:
• वेलदोड्याची आयुर्वेदिक औषधे महत्त्व:
• पोट विकार झाल्यास, पोट फुगी व गॅसेस प्रॉब्लेम झाल्यास दहा वेलचीची पूड करुन ती पाण्यात टाकून उकळून त्याचा काढा करुन दर दोन तासाने सेवन केल्यास अजीर्ण व पोटदुखी बरी होते.
• पित्त विकाराने उलटी होत असेल, किंवा अपचन क्रियेमुळे उलटीचा त्रास होत असेल तर वेलदोडे घालून काढा करुन पिण्याने फायदा होतो.
• थंडीच्या दिवसात कफ, खोकला झाल्यास आपण वेलदोडे व सुंठ पावडर एकत्र करुन त्यांचे सेवन मधासोबत दिवसातून चार पाच वेळा केल्यास कफ व खोकला कमी होतो.
• वेलदोड्यामध्ये भुक वाढवणारे घटक असतात. यामुळे भूक वाढते. तसेच थकवा दूर करण्याचे व त्वचा उजळ करण्याचे काम वेलदोडा करतो.
• पोटात आतील बाजूस अल्सर असेल आतील बाजूस जखमा होतात त्या बऱ्या करण्याचे, आग जळजळ कमी करण्याचे काम तसेच सूज कमी करण्यासाठी वेलदोडे खाणे फायद्याचे असते.
• अँटी ब्याक्टेरीया गुणधर्मामुळे तोंडातील वाढणारे घातक जिवाणू नष्ट करण्याचे काम वेलदोडा करतो. त्यामूळे जेवणानंतर एक तरी वेलदोडा खावा. ज्याने मुखशुद्धी होते.
• वेलदोडे खाल्याने सेक्स लाईफ सुधारते.
• शरीरातील वाईट कलोरेस्टरोल काढून टाकण्याचे काम वेलदोडा करतो. त्यामूळे ब्लडप्रेशर नियंत्रित करण्यासाठी वेलदोडा खाणे फायद्याचे असते.
• शरीरात आयर्न म्हणजेच लोहाचे व कॅल्शियम वाढवण्याचे कार्य वेलदोडे करतात. व्हिटामिन सी त्यामध्ये मोठ्याप्रमाणात असते.
• पचनसंस्थेचे आरोग्य सुधारणेसाठी जठर व पोटाच्या समस्या, गॅसेस यावर वेलदोडे खाणे फायद्याचे असते.
• वेलदोडे, सुंठ, लवंग, शहाजिरे, यांची पेस्ट अपचनवर उपयुक्त आहे.
• पित्ताने जळजळ होत असेल तर वेलदोडे खाल्याने पित्त कमी होते.
• वेलदोड्याचा उपयोग चहा, वेगवेगळे गोड पदार्थ करताना केला जातो.
• असा हा वेलदोडा बहुगुणी आहे.
No comments:
Post a Comment
ही कोणतीही सरकारी वेबसाईट नसून प्रायव्हेट आहे. तुम्ही सरकारी वेबसाईट पाहून खात्री करून घेऊ शकता.