Sunday, September 29, 2024

लसणाचे औषधी महत्व Garlic is useful for health

 लसणाचे औषधी महत्व

मराठी नाव : लसूण,

लसणाचे औषधी महत्व Garlic  is useful for health


• हिंदी नाव. : लहसून,

• इंग्लिश नाव : Garlic


• कुळ : Liliaceae

• उत्पादक देश: भारत, चीन.


• स्वरूप : लसूण हा दिसायला पांढर्या रंगाचा असतो. बारीक पांढरा पापुद्र्याखाली अनेक लहान लहान कुड्या असतात. या कुड्या पासूनच पुन्हा निर्मिती करता येते. व् खाण्यामध्ये देखील यांचाच समावेश होतो.

लसणाचे औषधी महत्व Garlic  is useful for health


• पाने : लसूण हे एक पीक असून. त्याची लागवड शेतात केली जाते. एक प्रकारे ते भूमिगत कंद आहे. याची पाने कांद्याच्या पातीसारखी असतात.

• वास : उग्र तिखट

लसणाचे औषधी महत्व Garlic  is useful for health


• घटक : कॅल्शियम, फोस्परस पोटॅशियम, आयर्न, व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए व व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स असते.


लसणाचे औषधी उपयोग:

लसणाचे औषधी महत्व Garlic  is useful for health


• खूप दिवसांची सर्दी खोकला असेल तर लसूण सोलून ती चेचून दुधात शिजवावी व ते दूध प्यावे खोकला कमी होतो.

• लसणाचा रस, आवळ्याचा रस, सैंधव मीठ, भाजलेला हिंग एकत्रित करुन त्याचे दररोज सेवन केल्यास पोटाची चरबी कमी करण्यास मदत करते.

• डांग्या खोकला झाल्यास लसणाचा रस व ऑलिव्ह ऑइल एकत्रित करून छातीपासून ते पोटापर्यंत चोळल्यास डांग्या खोकला बरा होतो.

• श्वास नलिकेत निर्माण झालेली सर्दी तसेच कंठात निर्माण झालेला कफ कमी करून श्वसन संस्था सुधारणेसाठी व शरीरातील अनावश्यक टॉक्सिन काढून टाकण्यासाठी लसूण आहारात घेणे फायद्याचे असते.

• सर्दी, खोकला, दमा या रोगात लसूण खाणे व त्याचा वास घेणे गुणकारी असते.

• पित्त रोग म्हणजे ॲसिडिटी झाली असेल तर, पोटदुखी असेल, गॅसेस प्रॉब्लेम, मूळव्याध , जुलाब होणे यावर लसूण आहारात असल्यास या रोगांचे व त्यामुळें होणाऱ्या त्रासाचे प्रमाण कमी होते.

• लसणात आलोसिन नावाचा घटक असतो, ज्यात अँटी ब्यक्टेरिया, अँटी व्हायरस, अँटी फंगल, अँटी ऑक्सीडंट असते. ज्यामुळे इन्सुलिन वाढते. व् आजार दूर करते.

• लकवा प्यारेलीसिस झाल्यास लसूण कुड्या तेलात तळून खाव्यात लकवा बरा होण्यासाठी मदत होते. तसेच तोंडाचा तोत्रेपणा कमी होतो.

• लसूण खाल्यामुळे रक्तातील बॅड कोलेस्टेरॉल कमी होते. तसेच रक्त पातळ होते. धमनी काठिण्य म्हणजेच कोलेरेस्टरोल कमी करण्यासाठी व ब्लडप्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी रोज दुधात उकळून किंवा तुपात भाजलेला लसूण खाणे फायद्याचे असते.

लसणाचे औषधी महत्व Garlic  is useful for health


• गाईच्या तुपात तळून काढलेला लसूण खाण्याने संधिवात, कंबरदुखी कमी होते.

• शरीराचा कोणताही भाग दुखत असेल तर लसूण चिरडून हळद घालून लावावा. आराम पडतो.

• स्त्रियांची मासिक पाळी थांबल्यावर त्यांना शरीरात झालेल्या बदलामुळे अशक्तपणा येतो, हाडे ठिसूळ बनतात,त्यांनी जर लसूण नियमित सेवन केल्यास फायदा मिळतो.

• मानसिक तणाव तसेच मायग्रेनचा त्रास असल्यास, लसूण खाणे फायद्याचे असते.

• टिबी, निमोनिया रोगात एक लिटर पाण्यात पाव लिटर दूध घालून उकळून तयार केलेले दूध दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावे लाभ होतो. टीबी बरा होतो.

• हाडांची, त्वचेचे, अंतर्गत ग्रंथींची झीज भरून काढण्यासाठी तसेच आतड्यांची आंतरक्रिया सुधारण्यासाठी लसूण खाणे फायद्याचे असते.

• लसूण उपाशीपोटी खाल्याने कॅन्सर रोगात झालेल्या गाठी कमी होण्यास मदत होते. यासाठी उपाशीपोटी लसूण खाणे फायद्याचे असते.

• डोकेदुखी असेल तर लसूण चिरडून डोक्याला लावणे फायद्याचे असते.डोकेदुखी थांबते.

• शुक्र धातू वाढवून कामोत्तेजकता वाढवण्यास लसूण मदत करतो.शरीरावर जखम झाल्यास त्यामधे किडे निर्माण झाल्यास लसूण व मीरे वाटून लावल्यास किडे बाहेर निघतात.

• मुकामार लागला असेल तर लसूण, गूळ व हळद एकत्रित वाटून लावल्यास सूज उतरते. व् वेदना कमी होतात.

• एखादा व्यक्ती बेशुद्ध झाला असेल तर लसूण चिरडून वास द्यावा शुध्द येते.

लसणाचे औषधी महत्व Garlic  is useful for health


लसूण खाण्याचे तोटे :

• लसूण जास्त सेवन केल्यास तामसिक वृत्ती वाढते. चिडचिड निर्माण होते.

तोट्यापेक्षा फायदे जास्त प्रमाणात लसणात आहेत.


No comments:

Post a Comment

ही कोणतीही सरकारी वेबसाईट नसून प्रायव्हेट आहे. तुम्ही सरकारी वेबसाईट पाहून खात्री करून घेऊ शकता.

चींचूरडी /चिंचुर्डी आयुर्वेदीक औषधी वनस्पती की जाणकारी Chinchurdi ayurvedik vanaspati ke bare me jankari

  चींचूरडी /चिंचुर्डी आयुर्वेदीक औषधी वनस्पती की जाणकारी Chinchurdi ayurvedik vanaspati ke bare me jankari • हिंदी नाम : चींचुर्डे, • मराठी...