Sunday, September 29, 2024

अमरकंद वनस्पतीविषयी आयुर्वेदिक माहिती Benefits of ayurvedic medicine amarkand

 अमरकंद वनस्पतीविषयी आयुर्वेदिक माहिती
Benefits of ayurvedic medicine amarkand
अमरकंद वनस्पतीविषयी आयुर्वेदिक माहिती  Benefits of ayurvedic medicine amarkand


• मराठी नाव : अमरकंद, मानकंद,

• हिंदी नाव : गोरुमा, अंबरकंद,

• संस्कृतनाव : मालाकंद, पंक्तीकंद,


• आढळणारे देश : 

भारत , ब्रह्मदेश, चीन, श्रीलंका, म्यानमार व आग्नेय आशिया, व उष्ण कटबंधातील देश.


• वनस्पती प्रकार : 

 हे एक भूमिगत कंदमूळ असून ती एक रोपवर्गिय वनस्पती आहे.

• गुणधर्म : अमरकंद हे चवीला स्निग्ध, तिखट उत्तेजना देणारे तसेच भूक वाढवून उल्हासित करणारे कंदमुळं आहे.


• पाने : या झाडाचे पान साधे पान या प्रकारात मोडतात. कर्दळीच्या किंवा हळदीच्या पानाप्रमाणे ही पाने दिसतात. पाने एकमेकाच्या सोबतीने वाढतात.

• खोड : या वनस्पतीत खोड नसून त्याचे पानांचा जोडणारी रचना ही मऊ मासल खोडाप्रमाणे असते.

अमरकंद वनस्पतीविषयी आयुर्वेदिक माहिती  Benefits of ayurvedic medicine amarkand


• औषधी भाग :

या वनस्पतीचे मूळ हे एखाद्या शंकूच्या आकाराचे पिवळसर तपकिरी रंगाचे हळकुंडा प्रमाणे असते. याच भागाचा औषध म्हणून वापर करतात. एकमेकाला लागून अनेक कंद लागतात.


अमरकंदाचे औषधी गुणधर्म व महत्त्व:

अमरकंद वनस्पतीविषयी आयुर्वेदिक माहिती  Benefits of ayurvedic medicine amarkand


• पायाला भेगा पडल्या असल्यास अमरकंद व हळद भाजून खाल्यास पायाच्या भेगा मुजतात.

• हातापायाला मुंग्या मारत असतील, बधिरता आली असल्यास, मणक्यातील ग्याप निर्माण झाला असेल, गुडघ्यातील स्नायूंची झीज झाली असेल तर अमरकंद खाणे फायद्याचे असते.

• संधिवात असेल, गुडघ्याचे स्नायू दुखत असतील तर तसेच स्नायू बधिरता असल्यास अमरकंद खाणे फायद्याचे असते.

• हाडांच्या जोडात वेदना असतील, मान दुःखी असल्यास, साईटीका रोगामुळे जर पाय दुखत असल्यास किंवा नसेतून वेदना होत असल्यास अमरकंद खाणे फायद्याचे असते.

• शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी तसेच कावीळीसारख्या  आजार झाल्यास अमरकंद खाणे लाभकारी असते.

• मज्जातंतू मधील समस्या, शरीरातील अंतर्गत दुखणे, स्नायू आखडणे, यावर अमरकंद खाणे गुणकारी असते.

• शरीरावर किंवा शरीरा अंतर्गत कोशिका वाढून गाठी तयार होतात. त्या कमी करण्यासाठी आपण अमरकंद खाणे चांगले असते.

• श्वास नलिकेत आग होऊन वेदना होत असल्यास, तसेच गलगंड उठल्यास रक्तातील विकार निर्माण झाल्यास आपण अमरकंद खाणे फायद्याचे ठरेल.

• शरीरात कृमी निर्माण झाल्यास व निरुपयोगी गाठी वाढल्यास त्या नष्ट करण्यासाठी अमरकंद खाणे फायद्याचे असते.

• बाळंतपणात सिजर झाल्यास त्यावेळी वापरलेल्या औषधाने, इंजेक्शनामुळे शरीरातील हाडांची झीज होते. तसेच स्नायुबंध दुखवल्याने त्याचे दुखणे निर्माण होते. अशा स्त्रियांना मणक्याचे विकार निर्माण झाल्यास अमरकंद सेवन करणे लाभकारी असते.

अमरकंद वनस्पतीविषयी आयुर्वेदिक माहिती  Benefits of ayurvedic medicine amarkand


अमरकंदाचे कसे सेवन करावे?

• अमरकंदाची पावडर करून ती रोज सकाळी व संध्याकाळी दुधासोबत किंवा पाण्यासोबत थोडा वेळ शिजवून त्याचे पाणी किंवा दूध पिणे फायद्याचे असते. कारण त्यात अमरकांदाचे गुणधर्म म्हणजे प्रथिने उतरलेली असतात.

• शरीरावरील गाठी तसेच सूज येणे यासाठी अमरकंद व गोमूत्रात वाटून त्याची पेस्ट करुन लावल्यास सूज उतरते व गाठी देखील कमी होऊ शकतात.

• अमरकंदाची पेस्ट किंवा जडाचा गड्डा चेचून दूध किंवा पाण्यातून शिजवून पिल्यास पोटातील कृमी मरतात. तसेच गाठी वितळू लागतात. सलग पंधरा दिवस हा उपचार करावा.

• याचे कंद घेवून ते सुकवून त्याचे चूर्ण करून ठेवावे. व थोडे थोडे आहारात सकाळी व संध्याकाळी पाण्यासोबत किंवा दुधासोबत घेणे फायद्याचे असते.

• ठिसूळ हाडे मजबूत करण्याचे काम हे अमरकंद करते.

अशी आहे.

 अमरकंद वनस्पतीविषयी आयुर्वेदिक माहिती

Benefits of ayurvedic medicine amarkand

No comments:

Post a Comment

ही कोणतीही सरकारी वेबसाईट नसून प्रायव्हेट आहे. तुम्ही सरकारी वेबसाईट पाहून खात्री करून घेऊ शकता.

चींचूरडी /चिंचुर्डी आयुर्वेदीक औषधी वनस्पती की जाणकारी Chinchurdi ayurvedik vanaspati ke bare me jankari

  चींचूरडी /चिंचुर्डी आयुर्वेदीक औषधी वनस्पती की जाणकारी Chinchurdi ayurvedik vanaspati ke bare me jankari • हिंदी नाम : चींचुर्डे, • मराठी...